breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#pcmc: जम्बो कोविड सेंटरमध्ये नर्सेसला ‘ठरलं 30 हजार अन् दिले 5 हजार’

तीन महिन्याचा करार,पण दीड महिन्यात कामावरुन काढलं, मनसे महिला आघाडीचे आंदोलन

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

विर्दभातून सर्वसामान्य कुटूंबातील परिचारिका आपल्या लहान-लहान मुलांना घेवून पिंपरी चिंचवड जम्बो कोविड सेंटरमध्ये कामास आल्या. ठेकेदाराने त्या परिचारिकांकडून बारा-चाैदा तास कामही करुन घेतलं, पण करोना आटोक्यात येताच 30 हजार ठरलेले वेतन न देता केवळ 5 हजार रुपये हातावर टेकवून दीड महिन्यातच त्यांना हकलून दिले. त्या परिचारिकांच्या मदतीला मनसे महिला आघाडीने आज (मंगळवार) आंदोलन करीत त्यांना न्याय मिळवून देण्यासह संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.

जम्बो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बॅगा फेकून देत हाकलून दिल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकारी रुग्णालयावर मोर्चा काढून ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले (मनसे ), शहर सचिव रूपेश पेठकर, महिला शहराध्यक्षा अश्‍विनी बांगर, उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ, शहर उपाध्यक्ष राजू सावळे, सीमा बेलापूरकर, मयूर चिंचवडे, दक्षता क्षीरसागर, हेमंत डांगे, विशाल मानकरी, दत्ता देवतरसे आदींनी सहभाग घेतला.

राज्य सरकार, पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या संयुक्तपणे नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम मैदानात 800 बेडचे जम्बो रुग्णालय एक सप्टेंबरपासून कार्यान्वित केले आहे. या रुग्णालयासाठी अकरा महिन्याच्या करारावर परिचारिका व वॉर्ड बॉयची ‘जम्बो’ भरती केली. परंतु दीड महिन्यातच झपाट्याने शहरातील बाधितांची संख्या कमी झाली. सध्या या रुग्णालयात 300 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याने महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा धडाका लावला आहे. यात जिल्ह्याबाहेरील कर्मचारी भरडले जात आहेत. 15 दिवसांपासूनच त्यांचे काम थांबवले होते. रुग्णालय संचालनालयाचे काम मेडब्रो एजन्सी करीत आहेत. बेस्ट एजन्सीने मनुष्यबळ पुरवले आहे.

दरम्यान, या रुग्णालयात 400 जणांची नेमणूक केली. त्यांना किमान कायद्यानुसार वेतन दिले आहे. प्रशासनाकडून अद्याप बिल मिळाले नाही. रुग्ण कमी झाल्याने प्रशासनाच्या सांगण्यावरूनच 300 पैकी 80 परिचारिका आणि 80 पैकी 30 वॉर्ड बॉय काढून टाकले आहेत. या रुग्णालयाचे डीन संग्राम कपाले यांनी “क्वॉलिटी कंट्रोल’ परीक्षा घेतली. जे नापास झाले त्यांना काढून आतापर्यंत आम्ही स्वत:च्या खिशातून 70 टक्के वेतन दिले आहे. सध्या एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवले असून त्यांचा खर्च प्रशासन उचलत आहे. प्रशासनाने अद्याप बिल दिले नसल्याचे ठेकेदार तेजींदरसिंग अहलुवालिया यांनी सांगितले.

जम्बो कोविड सेंटरमधील परिचारिकांना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांचे साहित्य बाहेर फेकून देत ठरलेला पगार न देणे, तीन महिन्यांचा करार पण दीड महिन्यातच हकलणे, त्याशिवाय उपाशी पोटी त्यांना ठेवून हात-पाय तोडण्याची भाषा संबंधित ठेकेदाराकडून केलीय जातेय, त्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी

रुपाली ठोंबरे-पाटील – शहराध्यक्ष पुणे मनसे महिला आघाडी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button