पवना धरण १०० टक्के भरलं, नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. धरणातून १४०० क्यूसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा चारवेळा पवना धरण १०० टक्के भरले आहे. सप्टेंबर अखेरीस धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील वर्षेभर पाण्याची चिंता नाही. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे पुढील प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा – Whatsapp ने नुकत्याच लाँच केलेल्या चॅनल फिचरमध्ये अनफॉलो कसे करायचे?
पवना नदी काठच्या सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठची शेतीची अवजारे, जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.





