आमची वाघीण निवड सार्थ करणार! : शिवसेना उपनेतेपदी सुलभा उबाळे
निवडीनंतर यमुनानगरमध्ये महिला शक्तीचा जल्लोष

सुलभा उबाळे यांच्या निर्णयाचे कार्यकर्त्यांकडून स्वागत
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या सुलभा उबाळे यांची पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाली. या निवडीचे महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार स्वागत केले. “आमची वाघीण पक्षाची निवड सार्थ ठरवेल” असे सांगत महिलांनी परिसरात पेढे वाटत आपला आनंद व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आक्रमक, अभ्यासू नेतृत्व म्हणून सुलभा उबाळे यांची ओळख आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अनेक विषयांना महापालिकेच्या सभागृहात वाचा फोडली. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न असतात. अशा भावना या निमित्ताने महिलांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा : धुलीवंदनच्या दिवशी सावरकर उद्यानात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करा; नंदकुमार सातुर्डेकर यांची मागणी
सुलभा उबाळे यांची उपनेतेपदी निवड झाल्यानंतर यमुना नगर भागातील महिलांनी जोरदार जल्लोष केला. परिसरात महिलांनी पेढे वाटले. दमयंती गायकवाड, नयना पारखे, कावेरी परदेशी, वैशाली जिडे वार, दीपा जगते, समीक्षा जगते, निर्मला पाटील आदी उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
महिला भगिनी, नागरिक, कार्यकर्ते या सर्वांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. अनेक वर्षे या भागांमध्ये काम करत आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह, संघटनात्मक वाढ लक्षात घेऊन उपनेते पदाची जबाबदारी घेतली आहे. या माध्यमातून सर्वांनाच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.
– सुलभा उबाळे, शिवसेना, उपनेत्या.