Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मावळ तालुक्यातील एकही आदिवासी बांधव घरकुलापासून वंचित राहता काम नये’; आमदार सुनील शेळके

मावळ : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद अभियान माध्यमातून पवन मावळ भागातील चावसर, मोरवे व तुंग या गावांना भेट दिली . यावेळी आमदार शेळके यांचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणूक काळात या गावांमध्ये प्रचार दौर्‍यानिमित्त भेट देणे शक्य होऊ शकले नव्हते, तरी देखील या गावांनी भरभरुन प्रेम व आशीर्वाद दिले आहेत, याबद्दल आमदार शेळके यांनी ग्रामस्थांचे  ऋण व्यक्त केले.

या भागातील ग्रामस्थांच्या रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना, स्वस्त धान्य यांबाबतच्या अडचणी प्रत्यक्षपणे जाणून घेत त्या मार्गी लावणे कामी प्रशासनास तात्काळ सूचना देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने या भागात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध होतं नाही ही खदखद आदिवासी बांधवांनी शेळके यांच्या समोर मांडल्याने तत्काळ शासनाच्या जागेत कसे घरकुल उभे करून देण्यात येईल त्यासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्या कडे उपलब्ध नसल्याने त्वरित अन्नपुरवठा विभागामार्फत या भागात कॅम्प घेऊन आदिवासी बांधवांच्या कागद पत्रांची पूर्तता करून घेण्याच्या अधिकाऱ्यांना शेळके यांनी सूचना दिल्या.

हेही वाचा  :  महाराष्ट्र केसरी ‘‘राडा’’ : पैलवान शिवराज राक्षे, महेंद्र गायवाड तीन वर्षे निलंबीत 

त्याचप्रमाणे चावसर या गावातील विठ्ठलवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने गावाला पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती आमदार शेळके यांनी शेतकरी यांच्या सोबत संवाद केल्यानंतर शेतकरी तात्काळ जागा देण्यास तयार झाले त्यामुळे तोही प्रश्न जागीच मिटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याच भागात दौरा करत असताना ठेकेदारने अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट सोडल्याचे शेळके यांच्या लक्षात येताच ठेकेदाराला लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान,  सा. बां. विभागाचे उपअभियंता श्री. धनराज दराडे यांसह महसूल, विद्युत, वन विभाग, अन्न पुरवठा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समितीतील इतर अधिकारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्फुर्तपणे सहभागी झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button