कायद्याचे केवळ ज्ञान नाही, अंमलबजावणी महत्त्वाची; ॲड. मंगेश खराबे
कायदे विश्व: नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा आयोजित

पिंपरी- चिंचवड | कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये फक्त कायद्याचे ज्ञान महत्त्वाचे नाही. तर त्या कायद्यांचे प्रत्येकाने पालन करणे यातून समाजावर होणाऱ्या परिणामांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे असा सूर कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चिखली पोलिस स्टेशन द्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते बोलत होते. कार्यशाळेमध्ये अॅड. मंगेश खराबे आणि अॅड. प्रीती साठे यांनी नवीन बीएनएस, बीएनएसएस, बीएसए या तीन नवीन कायद्यांबद्दल सखोल मार्गदर्शन केले.कार्यशाळेसाठी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी पुढाकार घेतला.
हेही वाचा : पेट्रोल-डिझेल खराब होते का? जाणून घ्या किती दिवसांत इंधन खराब होतं?
ही कार्यशाळा इंद्रप्रस्थ गार्डन मंगल कार्यालय, पाटील नगर, चिखली गाव येथे संपन्न झाली. कार्यशाळेत माजी नगरसेवक संतोष मोरे, हवेलीचे माजी उपसभापती सुभाष मोरे, माजी नगरसेविका साधना मळेकर, तसेच दत्तूनाना मोरे, माऊली तापकीर, जयवंत मोरे, पंडित मोरे, रामभाऊ भांगरे, शंकर मोरे, नारायण भुजबळ, अॅड.संपत भुजबळ, अॅड. निलेश टिळेकर, आयबीएम कॅालेज , चिखली ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला दक्षता कमिटी, महिला भरोसा सेल, शांतता कमिटी, शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, कंपनी व वर्कशॉपचे मालक आणि व्यवस्थापक सहभागी झाले होते.
अॅड. मंगेश खराबे म्हणाले की, आजच्या गतिमान आणि बदलत्या समाजात, प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकारांबद्दल जागरूक असणे, आणि त्यांचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच हेतूने, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस स्टेशनने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नव्या कायद्यांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ॲड साठे म्हणाले की, नागरिकांचा कायदेशीर दृष्टिकोन बदलणे, त्यांना प्रेरित करणे आणि एक अधिक सुरक्षित व समृद्ध समाज निर्माण करणे. हेच बदलत्या कायद्याचे वैशिष्ट्य आहे.