Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका निवडणूक : मुख्य निवडणूक निरीक्षकपदी निरंजन कुमार सुधांशू, तर निवडणूक निरीक्षक म्हणून सरिता नरके यांची नियुक्ती

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) चे संचालक निरंजन कुमार सुधांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवडणूक निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून सांगली जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा सरिता नरके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

हेही वाचा      :            नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे मेट्रोची खास सेवा; आज मेट्रो रात्रभर सुरू राहणार  

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू यांच्या संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६०९०७५८ हा असून निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६०९०७५७ हा आहे. तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक यांचा अधिकृत ई-मेल आयडी [email protected] असा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button