Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे मेट्रोची खास सेवा; आज मेट्रो रात्रभर सुरू राहणार

Pune Metro | नववर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांना सुलभ वाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) विशेष सेवा जाहीर केली आहे. त्यानुसार आज (३१ डिसेंबर) ११ वाजेपासून उद्या (१ जानेवारी) सकाळी ६ वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे. या कालावधीत गाड्यांची वारंवारिता साधारण २० मिनिटांची असेल; मात्र, गर्दीच्या प्रमाणात ती रात्रभर समायोजित करण्यात येईल. सकाळी ६ नंतर सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहील, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

दरवर्षी नववर्ष साजरा करणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच हॉटेल, उपहारगृह, बार, मद्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असते. अनेक नागरिक धार्मिक स्थळांवर जाऊन तसेच सामुहीक कार्यक्रमाचे आयोजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जाता येऊ नये आणि घरापासून नियोजित ठिकाणापर्यंत सुलभ प्रवास करता यावा म्हणून मेट्रो सुरू ठेवावा अशी मागणी विविध संघटनांकडून आणि मेट्रो प्रवाशांकडून करण्यात येत होती. तसेच मुंबई महामेट्रोने रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे महामेट्रोने रात्री ११ वाजेनंतर पहाटे सहा वाजेपर्यंत सर्व मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मेट्रोच्या निर्णयामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा     :        स्वार्थासाठी कधीही पक्षनिष्ठा बदलली नाही; जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही!

मेट्रोच्या दैनिक प्रवाशांची संख्या सध्या सरासरी वाढत असून सप्टेंबर २०२५ मध्ये ही संख्या २.५३ लाखांपर्यंत पोहोचली, ऑगस्टमध्ये २.१३ लाख आणि ऑक्टोबरमध्ये २ लाखांच्या आसपास होती. सण-उत्सव काळात (गणेश विसर्जन) ही संख्या आणखी वाढत असल्याने जादा सेवा देण्यात येते. त्याप्रमाणे नववर्षाच्या रात्री मोठ्या गर्दीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दीच्या आधारे मेट्रोची सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी (२०२३-२४) नववर्षानिमित्तही अशीच विस्तारित सेवा देण्यात आली होती, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले.

तयारी अन् सूचना

मेट्रो प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष तयारी केली आहे. गर्दी पाहून गाड्यांची संख्या वाढवली जाईल, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, सुरक्षा कर्मचारी आणि गर्दी नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहर पोलिसांनी मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी चौकाचौकांमध्ये अतिरिक्त कुमक तैनात करून वाहनधारकांची तपासणी यंत्रणा सज्ज केली आहे. सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोचा सुलभ प्रवास अवलंबावा असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले.

नववर्ष साजरा करण्यासाठी मेट्रोच्या मार्गिकांवरील वारंवारिता रात्री ११ नंतर उद्या पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी गर्दी न करता मेट्रो प्रवासाचा आनंद घ्यावा.

– चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button