पिंपरी / चिंचवड

डुडुळगावातून साडेनऊ लाखांचे दागिने चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

धायरकरवाडी डुडुळगाव येथून अज्ञात चोरट्याने 9 लाख 62 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 13 मे रात्री दहा ते 20 मे दुपारी बारा वाजताच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी एका महिलेने सोमवारी (दि. 23) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 9 लाख 62 हजार 380 रुपये किमतीचे सोन्याचे ब्लॅक बीडस रुबी प्लानवती सेट रुबी असे नाव असलेले 176.550 ग्रॅम वजनाचे गंठण चोरून नेले. हा प्रकार  13 मे रात्री दहा ते 20 मे दुपारी बारा वाजताच्या कालावधीत घडला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button