निगडी यमुनानगर येथील महापालिकेच्या रुग्णालयात प्रचंड असुविधा
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी लक्ष देण्याची भाजप पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांची मागणी

पिंपरीः निगडी येथील यमुनानगर सेक्टर 22 मधील महापालिकेच्या रुग्णालयात महिला प्रस्तुतिगृह उपलब्ध आहे. परंतु, या ठिकाणी 20/25 महिला प्रस्तुतिगृह ह्या ठिकाणी डिलिव्हरी साठी रोज येत असतात. मात्र या रुग्णालयात असुविधांमुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांची कमालीची गैरसोय होत आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तर या गंभीर प्रकाराबाबत महापालिका आयुक्त ठोस भूमिका घेतील का, असाही सवाल पिंपरी-चिंचवड भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांनी निवेदनाद्वारे विचारला आहे.
त्या ठिकाणी 24 डॉक्टर उपलब्ध नसल्याने भूलतज्ज्ञ फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध असतात. रात्री फक्त एक सर्जन ड्युटीवर असून, इतर स्टाफ उपलब्ध असतो. रुग्णालाअतिदक्षता विभाग (आयसीयू) उपलब्ध नसल्यामुळे डिलिव्हरी झाल्यामुळे किंवा सिजर करण्यासाठी ह्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही. तसेच निवारा केंद्र महिला प्रस्तुतिगृह या ठिकाणी पेशंट नातेवाईकांना रात्री राहण्यासाठी व्यवस्था नाही. त्या ठिकाणी अतिदक्षता विभागात डॉ लक्ष देत नाहीत अचानक यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णाला इमर्जन्सी पाठविण्यात येते. परिणामी महिलांना प्रसुतीसाठी धावपळ करावी लागते. त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन निगडी येथील सेक्टर 22 महिला प्रस्तुतिगृह ह्या ठिकाणी तातडीने महिला प्रस्तुतिगृह ह्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी.
हेही वाचा : Operation Sindoor । ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोष!
भूल तज्ज्ञ, सिजर तज्ज्ञ तसेच 24 तास ड्युटी नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचार घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जावे लागणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. गेल्या सहा महिन्यांपासून यमुना नगर रुग्णालय जन्म झाल्यानंतर लगेच बालक मरण पावले असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील महिला वर्ग यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. रुग्णालय परिचारिका देखील उद्धट वर्तन करत असतात. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष देऊन या रुग्णालयाची वाताहत थांबवावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.