पिंपरी / चिंचवड

प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) प्रचारात झंझावात; ‘गावभेट’ दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

​पिंपरी-चिंचवड : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण तापू लागले असून, प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील या प्रभागातील चारही उमेदवारांनी आज ‘गावभेट’ आणि ‘सोसायटी संपर्क’ अभियानावर भर देत प्रचाराचा धडाका उडवून दिला.

​स्थानिक उमेदवारांच्या बाजूने मतदारांचा कौल

​प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रियंका बारसे, भीमाताई फुगे (काकी), अमर फुगे आणि राहुल गवळी हे सर्व स्थानिक उमेदवार असल्याने त्यांना मतदारांकडून मोठे प्रेम मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि जनतेशी असलेल्या अतूट नात्यामुळे या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे.

​सत्ता नसतानाही ‘लोकसेवक’ म्हणून कार्याचा धडाका

​”नगरसेवक नसलो तरी लोकसेवक म्हणून काम करणे आम्ही कधीच थांबवले नाही,” ही भावना या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचवली आहे. सत्ता हातात नसतानाही प्रभागातील प्रलंबित प्रश्न स्वबळावर आणि सामाजिक उपक्रमांतून मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये या उमेदवारांबद्दल आदराची भावना आहे. २४ तास जनतेसाठी उपलब्ध राहणाऱ्या या चौकडीला “आपले हक्काचे लोक” म्हणून जनता स्वीकारताना दिसत आहे.

हेही वाचा –  ​नवी सांगवीत ‘धनुष्यबाणाची’ गर्जना; स्थानिक उमेदवारांच्या पाठीशी मतदारांचा खंबीर निर्धार!

​घरोघरी जाऊन ‘घड्याळा’चा प्रचार

​आज प्रभागातील सर्व सोसायट्या आणि गावठाण भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहराच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पॅनलला निवडून देणे गरजेचे आहे.

​गावभेट’ दौऱ्यावर विशेष भर

​आजच्या प्रचाराचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘गावभेट’ कार्यक्रम. जुन्या गावठाण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले. “आमची कामे करणारा माणूस आम्हाला हवा आहे,” अशा शब्दांत स्थानिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला. ‘एकच वादा, अजित दादा’ आणि ‘घड्याळा’च्या जयघोषाने प्रभाग क्रमांक ५ दणाणून गेला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“अजितदादांनी दिलेला विकासाचा शब्द आम्हाला पाळायचा आहे. गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही प्रभागातील सुख-दु:खात सहभागी आहोत. म्हणूनच, केवळ निवडणूक म्हणून नाही तर हक्काचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जनतेच्या दारात आलो आहोत.”

— प्रभागातील उमेदवारांची सामूहिक भावना

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button