Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपुणे

घरपोच सेवा महागली… जादा रुपये मोजावे लागणार

पुणे : परिवहन विभागाकडून टपाल (पोस्ट) विभागामार्फत परवाना (लायसन्स) आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) घरपोच मिळण्यासाठी आता सेवा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार परवाना किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी ५८ रुपयांऐवजी ७० रुपये द्यावे लागणार आहेत. एक जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने नागरिकांच्या खिशाला आता झळ बसणार आहे.

राज्याच्या परिवहन विभागामार्फत वाहन चालकाने चाचणी दिल्यानंतर तसेच नवीन वाहन घेतल्यानंतर परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र संबंधित व्यक्तींना घरपोच पाठविण्यात येते. त्यासाठी परिवहन विभागाने टपाल विभागाबरोबर सामंजस्य करार केला आहे. दरवर्षी या कराराचे नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार टपाल विभागाकडून या सेवेसाठी १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. त्यामुळे परिवहन विभागाकडून या सेवेसाठी नागरिकांकडून प्रत्येकी ५८ रुपये आकारले जात होते. टपाल विभागाने स्थानिक (जिल्ह्यातील) आणि गैरस्थानिक (जिल्ह्याबाहेरील) असे दोन दर आकारणीबाबत परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.

या प्रस्तावाला परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. याबाबत परिवहन विभागाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता नागरिकांंना परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी ५८ रुपयांऐवजी ७० रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा –  ​नवी सांगवीत ‘धनुष्यबाणाची’ गर्जना; स्थानिक उमेदवारांच्या पाठीशी मतदारांचा खंबीर निर्धार!

टपाल विभागाकडून स्थानिक पत्त्यावर जिल्ह्यांतर्गत सेवा देण्यासाठी ४४.६५ रुपये सेवाशुल्क आकारले जात होते. तसेच जिल्ह्याबाहेर (गैरस्थानिक) पत्त्यासाठी ८०.९९ रुपये असे दोन दर सूचवले होते. मात्र, ‘वाहन’ आणि ‘सारथी’ या ऑनलाईन प्रणालीमध्ये दोन वेगळे दर आकारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने परिवहन विभागाने परवाना किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी प्रत्येकी ७० रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे

परिवहन विभागाच्या घरपोच सेवेसाठी दरवाढ केल्यामुळे पक्क्या परवान्यासाठी ७७० रुपये (जुने दरानुसार ७५८), नुतनीकरण केलेल्या परवान्यासाठी ४७०(जुन्या दरानुसार ४५८) रुपये आणि दुचाकी चारचाकी एकत्र परवान्यासाठी १,०७० रुपये मोजावे लागणार असून एक ऑक्टोबर २०२५ पासून ज्या नागरिकांनी वाहने घेतली आहेत, पक्के परवाने किंवा नुतनीकरण केले आहे, त्यानुसार एक जानेवारीपासून वाढीव शुल्कानुसार आकारणी करावी असे निर्देश दिले आहेत.

सेवेचा आढावा

– पूर्वीचे टपाल शुल्क – ५८ रुपये जीएसटीसह

– नवीन टपाल शुल्क – ७० रुपये जीएसटीसह

– एकूण वाढ – प्रती सेवा १२ रुपयांची

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

परिवहन विभागाच्या निर्देशानुसार नागरिकांना घरपोच देण्यात येणाऱ्या सेवांच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

– स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button