Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे गाथा सन्मानाची-कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव!

शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांचा पुढाकार : जागतिक महिला दिनाचे निमित्त

पिंपरी-चिंचवड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा प्रा कविता आल्हाट यांच्या वतीने “गाथा सन्मानाची” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.

सदर सन्मान सोहळा गोदावरी आंगण, बोऱ्हाडे वाडी, मोशी येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी केले. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हेही वाचा –  ‘दुर्दैव, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका

विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या ,विशेषतः परिचारिका ,शिक्षिका, ब्युटीशियन, पोलीस कॉन्स्टेबल, तसेच इतर विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांना शहर अध्यक्ष कविता आल्हाट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.महिलांसाठी विविध खेळांचे , कलागुणांचे प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते.

महिलांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न…

राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेलच्या प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदद पवार, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या “गाथा सन्मानाची” या उपक्रमाद्वारे महिलांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button