नक्षत्रम एन विंग सहकारी गृह संस्थेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण दिवाकर देशमुख व सहाय्यक अभियंता प्रणोती पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
चिंचवड : नक्षत्रम एन विंग सहकारी गृह संस्था मर्या चिंचवड प्रेमलोक येथील संस्थेने उभारण्यात आलेल्या ४५ किलो वॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण दिवाकर देशमुख व सहाय्यक अभियंता प्रणोती पाटील यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नक्षत्रम एन विंग संस्थेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सभासदांनी जे योगदान दिले, त्याबद्दल सर्व सभासदांचे धन्यवाद मानून पुढील काळात संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व संचालक मंडळ कटिबद्ध राहील. एक आदर्श संस्था निर्माण करु. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महावितरण व सोलर स्व्केअर ने सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
सहाय्यक अभियंता महावितरण सौ प्रणोती पाटील यांनी भाषणात सांगितले की पुढील काळात संस्थेने अजून पर्यावरणपूरक प्रकल्प हाती घेऊन उत्कृष्ट रितीने पूर्ण करण्यासाठी महावितरण चे सहकार्य नेहमीच लाभेल आणि संस्थेने एक आदर्श म्हणून इतर संस्थांना मार्गदर्शन करावे.
उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण दिवाकर देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व सभासदांनी या प्रकल्पाकडे खर्च म्हणून न बघता ती एक संस्थेची गुंतवणूक म्हणून बघावे, तसेच निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम संस्थेने केले आहे त्याबद्दल सर्व सभासदांचे अभिनंदन व संस्थेच्या कामाचा आलेख असाच ऊंचावत जावा, यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना संस्थेच्या सेक्रेटरी अश्विनी पाटील यांनी प्रकल्प उभारताना सर्व संस्थाचे योगदान लाभले, त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या खजिनदार रश्मी ढेरे, धवल गोयल, विराल ठक्कर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऊदय चौगुले यांनी केले.




