विहिरीच्या पाण्याचे हक्क आणि वापराच्या कारणावरून एकावर खुनी हल्ला
![Murder attack on one for the right to use and use of well water](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/marhan1.jpg)
पिंपरी चिंचवड | सामाईक विहिरीच्या पाण्याचे हक्क आणि वापराच्या कारणावरून आठ जणांनी मिळून एकावर खुनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 1) दुपारी तीन वाजताच्या सुमारास सुसगाव येथे घडली.प्रमोद दशरथ ससार (वय 36, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार महेंद्र राम ससार, बजरंग राम ससार, सुरज हरिश्चंद्र पडवळ, वैभव हरिश्चंद्र पडवळ आणि अन्य चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींमध्ये असलेल्या विहिरीच्या पाण्याचे हक्क आणि वापराच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यातून गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांना अडवले.सुरज पडवळ याने तलवारीने, महेंद्र, बजरंग आणि वैभव यांनी लोखंडी रॉडने तर अन्य आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना मारले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. आरोपींच्या तावडीतून सुटून जात असताना आरोपींपैकी एकाने गोळीबार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.