राजकीय पक्ष स्थापन करणार का? मनोज जरांगे पाटील म्हणाले..

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आरपारचा लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अशातच जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत जरांगेंनी रोखठोक भूमिका सांगितली आहे.
मनोज जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, हे आमच्या डोक्यात पण नाही. आमचा राजकीय अजेंडा देखील नाही. गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी झाली पाहिजेत हे आमचं ध्येय आहे. त्यापासून आम्ही हटणार नाही. सोशल मीडियावर काय येतंय, त्यावर लक्ष देऊ नका. आरक्षण कसे मिळेल याकडे लक्ष द्या असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
हेही वाचा – ‘जनता सगळं जाणते, ती मुर्ख नाही’; अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे ट्वीट चर्चेत
मराठा आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. सरकारचे दुर्लक्ष होत असले तरी, येच्या १० फेब्रुवारीपासून त्यांना लक्ष द्यावेच लागणार आहे. आमरण उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सरकार ज्या गोष्टी करणार नाही, त्या गोष्टी मराठ्यांच्या एकजुटीने झाल्या आहेत, असंही ते म्हणाले.





