ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी अपहरण करून खून

पिंपरी चिंचवड | प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी चार जणांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत व्यक्तीचे सर्व कपडे काढून मृतदेह पोत्यात बांधून मुळा नदीच्या पात्रात फेकून दिला. ही घटना 31 जुलै 2019 रोजी घडली.धीरज मायराम नागर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुरज उर्फ सोन्या अरविंद जगताप (वय 35, रा. गांधी नगर झोपडपट्टी देहूरोड), अरिफ सिद्दीक शेख (वय 32, रा. पडवळ नगर, थेरगाव), सागर सुरेश जगताप (वय 30, रा. थेरगाव), चेतक नेपाळी (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरिफ शेख याच्या प्रेयसीला मयत धीरज यांचा मित्र दुर्गा साळवी याने पळवून नेले. या कारणावरून आरोपींनी आपसात संगणमत करून दुर्गा साळवी याचा मुंबई येथील पत्ता माहिती करून घेण्यासाठी मयत धीरज याचे 31 जुलै 2019 रोजी सायंकाळी सहा वाजता कान्हेगाव रेल्वे स्टेशन समोरून अपहरण केले. त्यानंतर मुळा नदीच्या पात्राजवळ वाकड येथे असलेल्या एका भंगाराच्या दुकानात आणून धीरज यांना मारहाण केली.

आरोपी सुरज याने धीरज यांचे पाय पकडले. आरोपी सागर आणि चेतक यांनी हात पकडले. त्यानंतर आरोपी सुरज याने धीरजचा गळा आवळून खून केला. धीरजची ओळख पटू नये यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे सर्व कपडे काढून मृतदेह एका पोत्यात घालून पोत्याचे तोंड बंद न करता मुळा नदीच्या पात्रात वाकड येथे टाकून दिले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी सुरज जगताप याला ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा सांगवी पोलिसांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button