Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डेंग्यू व मलेरियाला थोपविण्यासाठी पालिकेची व्यापक मोहीम

घराघरांत तपासणी, औषध फवारणी व जनजागृतीवर भर; ४० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरांत तपासणी, औषध फवारणी, जनजागृती उपक्रम तसेच कठोर दंडात्मक कारवाईला गती देण्यात आली आहे. याच अनुषंगाने १ जून २०२५ पासून आतापर्यंत सुमारे ४ हजार १३७ ठिकाणी नोटिसा बजावल्या असून, १ हजार १४२ जणांवर थेट दंडात्मक कारवाई करून ४० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध फवारणी, घराघरांत तपासणी, बांधकामस्थळांवरील पाहणी, कंटेनर तपासणी तसेच जनजागृती कार्यक्रम व दंडात्मक कारवाई अशा बहुआयामी मोहिमांना गती देण्यात आली आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतून समन्वय साधून याबाबतचा एकत्रित आराखडा तयार करण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे डासांची उत्पत्ती कमी होत असून, संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत आहे.

हेही वाचा       :        पिंपरी महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आता ‘आफ्टर-स्कूल’

पालिकेने १ जून २०२५ पासून १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत ९ लाख ८० हजार ३८० घरांची पाहणी तसेच तपासणी केली. त्यापैकी १४ हजार २७४ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीची चिन्हे आढळली. विविध ५१ लाख ८४ हजार ९७२ कंटेनर भांडी,ड्रम,कुंड्या,पाणी साठवणीची ठिकाणे आदी तपासले गेले; त्यापैकी १५ हजार ४०७ ठिकाणी डास वाढीस पोषक वातावरण नोंदले गेले. टायर पंक्चरची व भंगार दुकाने तपासून तातडीने सूचना व सुधारणा करण्यात आला 2 हजार हून अधिक कन्स्ट्रक्शन साइटवर तपासणी करण्यात आली. एकूण ४ हजार १३७ ठिकाणी नोटिसा बजावल्या तर १ हजार १४२ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करून ४० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबवल्या आहेत. औषध फवारणी, घराघरांत तपासणी, बांधकामस्थळांवरील पाहणी, कंटेनर तपासणी यांसोबतच नागरिकांसाठी जनजागृती मोहिमा राबवण्यात महापालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे. या मोहिमांमुळे डासांची उत्पत्ती कमी होऊन संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत आहे. पुढील काळातही ही कारवाई अधिक काटेकोरपणे व नियोजनबद्ध राबवली जाईल.

– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button