मोशीतील प्रदर्शनी स्कूलच्या निधी आंब्रे हिला किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक
शिक्षण विश्व: चौथ्या ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी

पिंपरी : प्रियदर्शनी स्कूल मोशी येथील इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी निधी आंब्रे हिने इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे झालेल्या चौथ्या ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.
या स्पर्धेत १४ देशांनी भाग घेतला. १५ वर्षांखालील मुलींच्या ५० किलो वजन गटामध्ये निधी हिने कांस्यपदक पटकावले.
हेही वाचा : ‘अजिंक्य डी वाय पाटील’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच केली ग्राम स्वच्छता!
या स्पर्धा एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान पार पडल्या. क्रीडा शिक्षक संकेत गावडे आणि प्राची बेल्हेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेतले.
शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त नरेंद्र सिंग म्हणाले, निधी हिने केलेली कामगिरी शाळेसाठी कौतुकस्पद आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी चमकवे यासाठी शाळेकडून विशेष प्रयत्न केले जातात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना चांगला खेळ करता यावा यासाठी शाळेकडूनच तज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.