Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लाखांहून अधिक मुलांचे ‘जेई’ लसीकरण!

महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाची लसीकरण मोहीम होत आहे यशस्वी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या जापनीज मेंदूज्वर (जेई) प्रतिबंधक लस मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील दोन लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात आली आहे. शहरात हे लसीकरण अभियान यशस्वीपणे राबवण्यात येत असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

शहरातील आरोग्य केंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये ही प्रभावी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण शहरात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत २५ मार्च २०२५ पर्यंत २ लाख ७ हजारांहून अधिक बालकांचे जेई लसीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा –  AI: मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी ‘एचआर’ यांनी ‘एआय’ वापरावे: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

रुग्णालयाचे नाव : लसीकरण झालेल्या बालकांची संख्या

आकुर्डी रुग्णालय : ३० हजार ९९७

भोसरी रुग्णालय : ३६ हजार ६७९

जिजामाता रुग्णालय : ३१ हजार ६४०

सांगवी रुग्णालय : २२ हजार ११८

तालेरा रुग्णालय : २३ हजार २१२

थेरगाव रुग्णालय : १६ हजार ७३०

यमुनानगर रुग्णालय : ३८ हजार २४

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय : ८ हजार १६०

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

बालकांचे आरोग्य ही आपल्या शहरासाठी प्राथमिकता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यामुळेच जेई लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबवत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालक, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था यांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. भविष्यातही आरोग्य क्षेत्रात अशी परिणामकारक पावले उचलण्याचे नियोजन आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

जापनीज मेंदूज्वर (जेई) हा विषाणूजन्य आजार असून याकडे देशातील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या जीवघेण्या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत जेई लसीकरण मोहीम शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये प्रभावीपणे राबवत आहे. या अंतर्गत शहरातील सर्व मुलांचे शालेय व समाजस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे.

– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

जापनीज मेंदूज्वर ही लस यापूर्वी घेतली असली तरी सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत ती पुन्हा घेणे आवश्यक आहे. जेणेकरून रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि या आजाराचा प्रसार रोखता येईल. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे.

– डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button