Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रौढ मतदार ठरविणार आमदार; 75 टक्के मतदार 30 ते 50 वयोगटात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 30 ते 60 वर्षे वयोगटांतील मतदारांची संख्या निम्मापेक्षा अधिक आहे. चिंचवड व भोसरी मतदारसंघात हे प्रमाण तर 65 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे एकूण 16 लाख 50 हजार 51 पैकी या प्रौढ 10 लाख 55 हजार 435 मतदारांचा कल ज्या उमेदवारांच्या बाजूने असेल, तो आमदार होऊ शकतो.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात एकूण 16 लाख 50 हजार 51 मतदार आहे. नावनोंदणीच्या 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत मतदारांची संख्या वाढून 18 हजार 676 ने वाढली आहे. मतदारांच्या युवा, प्रौढ आणि ज्येष्ठ मतदारांच्या वर्गवारीनुसार शहरात 30 ते 60 या प्रौढ वयोगटांतील मतदारांची संख्या सर्वांधिक आहे.

पिंपरी मतदारसंघात एकूण 3 लाख 90 हजार 187 पैकी 2 लाख 18 प्रौढ मतदार आहेत. त्यात पौढ पुरुषांची संख्या 1 लाख 27 हजार 880 आणि महिलांची संख्या 1 लाख 22 हजार 119 इतकी आहे. तृतीयपंथी मतदार 19 आहेत. चिंचवड मतदारसंघात एकूण 6 लाख 56 लाख 155 पैकी तब्बल 4 लाख 47 हजार 710 प्रौढ मतदार आहेत. त्यातील पुरुष 2 लाख 32 हजार 179 इतके तर, महिला 2 लाख 15 हजार 498 इतक्या आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 33 आहे.

हेही वाचा      –      ‘लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी ; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध 

भोसरी मतदारसंघात एकूण 6 लाख 3 हजार 707 पैकी प्रौढ मतदारांची संख्या तब्बल 4 लाख 7 हजार 707 इतकी आहे. त्या गटात पुरुष 1 लाख 97 हजार 71 इतके तर, महिला 1 लाख 90 हजार 326 इतक्या आहेत. तृतीयपंथी 59 आहेत.

चिंचवडमध्ये सर्वाधिक 68 टक्के प्रौढ मतदार आहेत. भोसरीत हे प्रमाण 64 टक्के आहे. पिंपरीत प्रौढ मतदारांचे प्रमाण 52 टक्के इतके आहे. हे मतदार अधिक परिपक्व असतात. ते संपूर्ण परिस्थितीचा विचार करून मतदान करत असल्याचे निवडणूक विभागाच्या आजपर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदान केले आहे.

मतदानांसाठी याच वर्गातील मतदार सर्वांधिक संख्येने घराबाहेर पडतो. मतदानासाठी हा वर्ग अधिक आग्रही असतो. या मतदारांची संख्या मोठी असल्याने हे मतदार ज्या उमेदवारांला पसंती देतील, तो उमेदवार विजयी होऊ शकतो.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button