मराठा क्रांती मोर्चाच्या अपघातग्रस्त कार्यकर्त्याच्या भेटीला आमदार रोहीत पवार रुग्णालयात
- उपारासाठी तानाजी भोसले कुटुंबियांना मदतीचे आश्वासन
पिंपरी : मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तानाजी भोसले यांना भीषण अपघात झाला. त्यामुळे गंभीर जखमी असलेले तानाजी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहीत पवार यांनी त्यांची भेट घेतली. तसेच, संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन उपचाराबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्रान शेख, प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, युवकचे प्रसाद कोलते, राहुल पवार,आयुष निंबारकर, बापू कातळे, प्रवीण खरात, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे आदी उपस्थित होते.
दसऱ्याच्या आदल्या दिवशी अपघातात गंभीर जखमी झालेले मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील कार्यकर्ते तानाजी भोसले याची थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. ते बेशुद्धावस्थेत आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांनी माहिती घेतली. त्यांना योग्य ते उपचार करण्यास सांगितले. तानाजीच्या आई-वडिलांना भेटत त्यांनाही रोहित यांनी धीर दिला. उपचारात कोणतीही अडचण आल्यास मदतीचे आश्वासनही दिले.






