मिशन विधानसभा : पिंपरी विधानसभेसाठी साकी गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात!
शरदचंद्र पवार यांच्याकडे केला कार्य अहवाल सादर : महाविकास आघाडीकडून इच्छुकांची रस्सीखेच
पिंपरी : आबेडकर चळवळीतील कार्यकर्ते योद्धा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल उर्फ (साकीभाऊ) गायकवाड यांनी कार्य अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन पिंपरी विधानसभा 206 राखीव मतदार संघासाठी सादर केला आहे.
यावेळी गायकवाड यांनी पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. यावेळी शरदचंद्र पवार यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहे त्यावेळी विशाल उर्फ साकीभाऊ गायकवाड यांची पिंपरी विधानसभा मतदारसंघा मधील संपुर्ण माहिती दिली आहे व सकारात्मक चर्चा झाली आहे. यावेळी उपस्थित पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, युवक अध्यक्ष पुणे शहर किशोर कांबळे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी साकीभाऊ गायकवाड यांच्याशी रिपब्लिकन आवाज न्यूज चे प्रतिनिधी प्रतीक वाघमारे यांनी फोन वरून चर5केली असता गायकवाड म्हणाले मी माझं संपूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीत घातले आहे व वयाच्या 17 व्या वर्षांपासून शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे तसेच योध्दा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून देखील सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात तसेच गरजूंना मदत करणे पिंपरी विधानसभा मतदारसंघात माझा मोठा जनसंपर्क आहे मी गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यामुळे माझ्या कामांची माझी पक्षा प्रति एकनिष्ठा यासर्व गोष्टींचा विचार करून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार , माझ्या कामाची दखल घेऊन मला नक्कीच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देतील अशी खात्री आहे.





