Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन विधानसभा निवडणूक : बलदेवनगर, शास्त्रीनगरमधील रहिवाशांची आमदार बनसोडे यांना साथ!

विरोधकांकडून व्यापाऱ्यांची बैठक असल्याचा ‘फेक नॅरेटिव्ह’

आमदार आण्णा बनसोडे यांना सर्वस्तरातील नागरिकांचा प्रतिसाद

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील बलदेवनगर, शास्त्रीनगर येथील रहिवाशी आणि मान्यवरांची बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांना साथ देण्याचा निर्धार रहिवाशांनी केला. तसेच, रहिवाशांच्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी कायम आग्रही भूमिका घेण्यात येईल, असे आश्वासनही आमदार बनसोडे यांनी दिले आहे.

पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार आण्णा बनसोडे सर्वस्तरातील नागरिकांच्या भेटी-गाठी करीत आहेत. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शास्तीनगर आणि बलदेवनगर येथील नागरिकांचे ‘स्नेहभोजन’ करण्यात आले. यावेळी नागरिकांनी बनसोडे यांना एकमूखी पाठिंबा दिला.

दरम्यान, शास्त्रीनगर व बलदेवनगर येथील कार्यक्रमावरुन सोशल मीडियावर ‘फेक नॅरेटिव्ह’ करण्याचा प्रयत्न केला. सदर बैठक ही रहिवशांची होती. मात्र, त्याला व्यापाऱ्यांची बैठक आणि त्यामध्ये सहभाग यावर चर्चा घडवून आणण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या फेक नॅरेटिव्हची पोलखोल झाली आहे. व्यापारी आणि उद्योजकांची आमदार आण्णा बनसोडे यांच्या बाबत सकारात्मक भूमिका असून, या निवडणुकीत सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने बनसोडे यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button