पिंपरी-चिंचवडमधील माटे शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
शिक्षण विश्व : 1970 ते 1990 या 20 वर्षांच्या आठवणींना मिळणार उजाळा

पिंपरी- चिंचवड | ”मागे वळून पाहताना गट आठवणींना उजाळा देऊ या खडू ,फळा आणि बाकावर बसणे अनुभवू या” या उद्देशाने माटे शाळेतील माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे 1970 ते 1990 या 20 वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
श्रीधरनगर, चिंचवड येथील माटे शाळेची स्थापना 1970 मध्ये झाली असून, त्यानंतर 1990 पर्यंत 20 वर्षांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा होणार आहे. शनिवार, दि. 22 मार्च 2025 रोजी दुपारी 4.30 ते 6.30 या वेळेत हा स्नेहमेळावा रंगणार आहे.
हेही वाचा : आकुर्डीतील डी वाय पाटील कॉलेज ‘आरडीएक्स’ने उडवण्याची धमकी
कवडसे आठवणीचे, पुनश्च अंगणी आले,
सुखद आठवणीची नक्षी, मनी चीतारुणी गेले
अशाच सुखद आठवणींचा, झोका मनसोक्त झुलायचा
गाणे गप्पा गोष्टींनी, खडू फळ्यात रमायला
खुणावितसे शालामाता, आमंत्रण आपणा सकला !
अशाच आपल्या शालेय जीवनातील आठवणींना देऊ या उजाळा …. मित्र-मैत्रिणी, गुरुजनांच्या सहवासात रमायला …. काळाशी सुसंगत आधुनिक डिजिटल सेवा सुविधांनी- प्रगतीसाठी सज्ज झालेली शालामाता …ग्लोबल शाळा अनुभवायला नक्की या, असे आवाहन शाळा व्यवस्थापक इंद्रायणी पिसोळकर यांनी केले आहे.