Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Masterstroke : आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनंतर ‘अनलॉग हिंजवडी’बाबत तातडीने बैठक!

#UNCLOGHinjawadiITPark :मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव घेणार हिंजवडी परिसरातील 'पाणीबाणी'वर आढावा

पिंपरी-चिंचवड | मान्सूनपूर्व तसेच मोसमी पावसामुळे गेल्या महिन्याभरात हिंजवडी परिसरात अक्षरशः ‘पाणीबाणी’ निर्माण झाल्याची स्थिती होती. या समस्येमुळे या भागातील नागरिक, आयटीयन्स यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. आयटी पार्कमधील कर्मचारी वर्ग तासंतास रस्त्यावर अडकून पडला. याशिवाय वारंवार होणारी वाहतूक कोंडी, मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी #UNCLOGHinjawadiITPark ही स्वाक्षरी मोहीम सुरू केल्यानंतर याची दखल घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती केली. यावर तात्काळ कार्यवाही सुरु झाली असून, प्रधान सचिव यांनी बैठक लावली आहे.

हिंजवडी आणि परिसरातील पायाभूत समस्या तसेच हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करणे या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव यांनी तातडीने संबंधित सर्व विभागांना सोमवारी (दि 30) बैठकीसाठी बोलावले आहे.

दरम्यान, काही दिवसपूर्वी हिंजवडी परिसरात पाणी साचून नागरिकांचा खोळंबा होतो, गैरसोय होते. याला नक्की जबाबदार कोण? याचीही झाडाझडती या बैठकीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव सोमवारी सायंकाळी पाच वाजता मुंबई मंत्रालयात याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीसाठी पिंपरी-चिंचवड, महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुणे जिल्हापरिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., टाटा मेट्रो, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांना बोलविण्यात आले आहे.

वाकड पिंपरी चिंचवड रेसिडेंट डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली होती. त्यामध्ये हिंजवडीचा पिंपरी- चिंचवड महापालिकेत समावेश करावा आणि पायाभूत सुविधा शिक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे लक्षवेधवे अशी मागणी केली होती.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या आजुबाजुला असलेल्या पीएमआरडीए हद्दीमध्ये पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करीत आहोत. वाहतूक समस्या, पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्था, कचरा समस्या आणि नागरी आरोग्य तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण पुढाकार घेण्याची माझी भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून होत असलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

हेही वाचा: महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! सातबारा उतारा आता थेट व्हॉट्सॲपवर! 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button