Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अर्थसंकल्पीय अधिवेशन : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ‘वुमन्स डे गिफ्ट’

दोन महिन्यांचे पैसे एकत्रित जमा होणार : महायुती सरकारची महत्त्वाची घोषणा

मुंबई । विकास कदम । राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने, तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे. दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी १५०० या प्रमाणे ३ हजार रुपयांची रक्कम ८ मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिन (International Women’s Day) दिवशी या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये हप्त्यांबाबतचा संभ्रम दूर होणार…

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button