ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरच्या विकासातील मोठा अडथळा दूर!

‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्त्याचे काम अखेर सुरू

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा १८ मीटर रुंद ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्ता अखेर काँक्रीटीकरणासाठी मार्ग मोकळा झाला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि प्रशासनाशी केलेल्या सातत्यपूर्ण संवादामुळे हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, हा रस्ता पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागातून जात असून अनेक गृहप्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, जमिनीचे अधिग्रहण, तांत्रिक अडचणी आणि प्रशासनिक कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कॉंक्रिटीकरण प्रलंबित होते. रस्ता अर्धवट असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास, वाहतूक कोंडी आणि गैरसोय भोगावी लागत होती.

हेही वाचा    :              कृष्णानगर येथे ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण 

दरम्यान, रस्त्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक सोसायट्यांचे पदाधिकारी, रहिवासी आणि नागरिक आनंद व्यक्त करत आहेत. भाजप लोकप्रतिनिधींनी दाखवलेली ही ‘राजकीय इच्छाशक्ती’ पिंपळे सौदागरला अधिक स्मार्ट बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या कार्यक्रमाला उद्योजक संदिप काटे, संजय भिसे, धनंजय भिसे तसेच परिसरातील इतर प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, आम्ही महापालिका प्रशासनासोबत नियमित बैठका घेतल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करून सर्व अडथळे दूर केले. निवडणूक दरम्यान ट्रायोज आणि झूलेलाल टॉवर्स सोसायटी रहिवासी आणि सौदागरच्या नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण होताना पाहून मोठे समाधान वाटत आहे. हा रस्ता केवळ सिमेंट-काँक्रीटचा रस्ता नाही, तर हा भागातील दळणवळणाची ‘लाईफलाईन’ आहे. तांत्रिक अडचणींमुळे काम ठप्प झाले होते, परंतु प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवादातून आज हे काम मार्गी लावले आहे. दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करून लवकरच नागरिकांच्या सेवेत हा रस्ता येईल, असेही शत्रुघ्न काटे यावेळी म्हणाले.

पिंपळे सौदागरच्या रहिवाशांसाठी हा रस्ता फक्त काँक्रीटचा रस्ता नाही, तर दळणवळणाची जीवनरेषा आहे. आम्ही दर्जेदार आणि वेगवान काम करून लवकरच नागरिकांच्या सेवेत हा रस्ता आणू, जेणेकरून नागरिकांना वाहतूक कोंडी आणि धुळीचा त्रास भोगावा लागणार नाही.

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button