भोसरी मतदारसंघात महेश लांडगे यांची मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत ‘हॅट्रिक’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/पुणे.-65-780x470.jpg)
भोसरी : विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांचा विजय झाला आहे. महेश लांडगे यांनी 63 हजार 634 मतांनी विजय मिळविला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा पराभव केला.
यानंतर महेश लांडगे यांच्या भोसरी येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला. महेश लांडगे यांच्या विजयानंतर भोसरी परिसरामध्ये मोठी मिरवणूक काढण्यात आली आहे. तसेच डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये सकाळी आठ वाजल्या वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीला निकालाची उत्सुकता कायम होती. महेश लांडगे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. तीन वाजेपर्यंत मतमोजणीच्या 23 फेऱ्या पूर्ण झाल्या. पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे आघाडीवर होते. तर दुसऱ्या क्रमांकावर अजित गव्हाणे होते. लांडगे यांना 2 लाख 21 हजार 578 मते मिळाली त्यांचा 63 हजार 634 मतांनी विजय झाला.