महाराष्ट्रात विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधित्व!
सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव यांची भावना : अमित गोरखे यांच्या विजयाने अन्याय दूर झाला!
पिंपरी : महाराष्ट्रात विधानपरिषद अस्तित्वात आल्यापासून प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले. पिंपरी चिंचवड: मा.अमित गोरखे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन महायुती सरकारने मातंग समाजावर झालेला हा अन्याय दूर केला, अशा भावना सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्य विधानपरिषदेवर मातंग समाजाला आतापर्यंत प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत क्रमांक दोनवर असलेल्या मातंग समाजाला आतापर्यंत एकदाही विधानपरिषदेवर नियुक्ती मिळालेली नव्हती. हा मातंग समाजावरचा राजकीय अन्याय होता. अगोदरच मातंग समाज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात मागासलेला आहे.या मागासलेल्या समाजाचा सर्व क्षेत्रात विकासात्मक दर्जा उंचावण्याकरिता राज्य विधानपरिषदेवर संधी मिळणे आवश्यक होते. २०२१ हे वर्ष साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष होता, त्याच काळात या मातंग समाजाला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचा, त्यांच्या संयुक्त महाराष्ट्रातील चळवळ व कामगार चळवळीतील योगदानाचा यथोचित सन्मान होणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही.
सध्याच्या महायुती सरकारने विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजातील माननीय आमदार अमित गोरखे उच्चशिक्षित, होतकरू व्यक्तीस न्याय देऊन प्रथमच मातंग समाजाचे प्रतिनिधी मा.अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी देऊन सन्मानित केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही संधी मिळावी…
विधानपरिषदेवर मातंग समाजाच्या नेत्याची निवड झाल्याने मातंग समाजामध्ये मागासवर्गीयांकरिता झटणारे व सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे, उच्च विद्याविभुषित सामाजिक व सार्वजनिक समस्यांची जाण असलेले, विविध क्षेत्रामध्ये अभ्यासू व अनुभव असणारे मातंग समाजाचे अनेक नेते माननीय अमित गोरखे यांना प्रतिनिधित्व देऊन महाराष्ट्राने पहिल्यांदाच मातंग समाजाला न्याय दिल्याने पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाचे नेते कीर्तीताई मारुती जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे. याचीच पुनरावृत्ती करत स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असेही आपल्या निवेदनात म्हटले आहे.