महापालिकांच्या विषय समितीच्या आठ प्रभाग अध्यक्षांना महिनाभराची लॉटरी…
![Lottery for a month for eight ward chairpersons of Municipal Subject Committee ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/pcmc-1-14.jpg)
- कोरोनाच्या अनुषंगाने निवडणुकींना मुदतवाढ; राज्याचा निर्णय…
पिंपरी |
कोरोनाचा विळखा वाढत असताना राज्य सरकारने महापालिकांच्या विषय समिती, प्रभाग अध्यक्षांच्या निवडणुका एका महिन्यासाठी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे मार्चअखेर मुदत संपलेल्या पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे अध्यक्षांना एक महिन्याचा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाल मार्च अखेर संपला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये प्रभाग अध्यक्षांची निवडणूक होणार होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने होत आहे.
वाढती रुग्णसंख्या आरोग्य सुविधांवर असणारा ताण, संक्रमणात होत असणारी वाढ यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या स्थायी समिती, सर्व विषय समिती सभापती, प्रभाग अध्यक्षांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा, एक महिन्यानंतर वस्तुस्थिती व तपशीलच्या आधार घेऊन निवडणुकाबाबत पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे राज्याच्या नगरविकास खात्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी महापालिकेला कळविले आहे.
वाचा- दोन गटात चिंचवड पोलीस ठाण्यासमोर टोळक्याची तुफान हाणामारी…