“महायुतीचा विकास रथ अविरत सुरू ठेऊया, शंकर जगताप यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊया”
रहाटणी वासियांना आमदार अश्विनी जगताप यांची साद..!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Chandrakant-Patil-Pune-1-780x470.jpg)
चिंचवड : भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच्या या विकास रथाला असेच अविरत सुरु ठेवूया. आणि महायुतीच्या उमेदवाराला मतदान रुपी आशीर्वाद देऊया अशी साद चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी रहाटणी वासियांना घातली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी रहाटणी प्रभागातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सदस्य यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.
हेही वाचा – मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी, ९ जण जखमी
आमदार अश्विनी जगताप म्हणाले की, रहाटणी परिसरामध्ये विविध विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही भाजपच्या माध्यमातून केला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विचारातील आणि संकल्पनेतील विकासात्मक धोरण राबविण्यामध्ये आम्ही सर्व भाजपा आणि महायुतीचे पदाधिकारी यशस्वी ठरत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चिंचवड विधानसभेतील प्रत्येक परिसरामध्ये सर्वांगीण विकास कसा होईल हाच आमचा संकल्प आहे.
महिलांच्या सक्षमीकारणासाठी, युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी, स्थानिकांच्या मुलभूत प्रश्नांसाठी आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव तत्परतेने कार्य केले. स्मार्ट सिटी अंतर्गत चिंचवड विधानसभेचा भौगोलिक विकास पाहता रहाटणी परिसरात देखील विविध लोकोपयोगी विकासकामे आणि लोककल्याणकारी योजना राबविल्या. जनतेचा सर्वांगीण विकास याच भावनेने प्रेरित असलेले भाजपा शहराध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर भाऊ जगताप यांना आपण भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन अश्विनी जगताप यांनी रहाटणी वासियांना केले.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी रहाटणी परिसराचा कायापालट केला. मूलभूत समस्यांना कधी राहटणी वासियांना सामोरे जाण्याची वेळ आली नाही. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर आमदार अश्विनी जगताप यांनीही आपलेपणाने रहाटणीच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही रहाटणी वासीय जगताप कुटुंब अर्थात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या सोबतच राहू असा विश्वास यावेळी उपस्थितांच्या वतीने देण्यात येत होता.