नव्या युगाचे नेतृत्व, विकासाचा नवा ध्यास: आशाताई भोंडवे यांचा ‘व्हिजनरी’ जाहीरनामा

पिंपरी-चिंचवड : राजकारणात आश्वासनांची रेलचेल असते; मात्र प्रश्नांची खोल समज, त्यावर ठोस उपाय आणि लोकांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व विरळाच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आशाताई भोंडवे यांनी आपला प्रभागस्तरीय जाहीरनामा (Micro-Manifesto) जाहीर करून, केवळ राजकारण नव्हे तर सेवेचा नवा आदर्श निर्माण केल्याची चर्चा पिंपरी-चिंचवडमध्ये रंगू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2026 मध्ये मामुर्डी- किवळे- रावेत- गुरूद्वार प्रभाग क्रमांक 16 मघून आशाताई भोंडवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. पक्षाच्या सर्वसाधारण जाहीरनाम्यापलीकडे जाऊन आशाताईंनी प्रत्येक गल्ली, वस्ती व सोसायटीतील समस्यांचा सखोल अभ्यास केला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सुरक्षा अशा मूलभूत प्रश्नांवर त्यांनी लेखी शब्द दिल्याने नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.“मी केवळ तक्रारी मांडायला नाही, तर उपाय देण्यासाठी आले आहे,” हा त्यांचा स्पष्ट निर्धार मतदारांपर्यंत पोहोचतो आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

विकासनगरमध्ये नागरिकांशी संवाद साधताना आशाताईंनी काढलेले हे उद्गार त्यांच्या नेतृत्वशैलीचे प्रतीक ठरत आहेत. मोठ्या सभांपेक्षा होम मीटिंग्स आणि कोपरा सभांवर त्यांनी भर दिला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळे आणि तरुणांशी थेट संवाद साधत त्यांनी ‘ऐकून घेण्याला’ प्राधान्य दिले. त्यामुळे त्या “हक्काचं माणूस” म्हणून ओळख निर्माण करत आहेत.
हेही वाचा – मिशन-PCMC: राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड हमीपत्र जाहीर!

“निवडून येण्याआधीच कामाला सुरुवात” हा मंत्र जपत आशाताईंनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिक आत्तापासूनच तक्रारी नोंदवू शकतात. Techno-Savvy लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा हा पुढाकार विशेषतः सुशिक्षित व तरुण मतदारांना आकर्षित करत आहे.

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय
1. महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि रोजगारासाठी आशाताईंनी दोन महत्त्वाकांक्षी संकल्पना मांडल्या आहेत—
2. ‘आशा क्लिनिक’: स्वस्त व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे विशेष क्लिनिक.
3. ‘आशाताईंचा कट्टा’: महिलांच्या सुरक्षेवर चर्चा, समुपदेशन आणि रोजगार संधींसाठी हक्काचे व्यासपीठ.
गेल्या पाच वर्षांतील प्रलंबित प्रश्नांवर—पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा—आशाताईंनी ठोस कृती आराखडा सादर केला आहे. “प्रश्नांची जाण, विकासाची ओढ” हे केवळ ब्रीदवाक्य न राहता त्यांच्या कार्यपद्धतीचे प्रतिबिंब बनले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“मी सत्तेसाठी नाही, सेवेच्या संधीसाठी उभी आहे.तुमचे प्रश्न ऐकणे, त्यावर लेखी उपाय देणे आणि बदल घडवणे—हीच माझी राजकारणाची व्याख्या आहे.”
– आशा भोंडवे, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 16.




