“आश्वासनांपलीकडचे नेतृत्व : प्रभाग १० च्या विकासासाठी अनुराधाताई गोरखे सज्ज”

पिंपरी | आजचा काळ हा केवळ आश्वासनांचा नसून काम, परिणाम आणि विश्वासाचा आहे. अशा काळात प्रभाग क्रमांक १० मधून उभ्या असलेल्या आदर्श शिक्षिका तसेच माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे या सुशिक्षित, कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या विश्वासास पात्र महिला उमेदवाराचे नेतृत्व हे प्रभागाच्या विकासासाठी आशेचा नवा किरण ठरत आहे.
अनुराधाताई गोरखे या केवळ भाषणांपुरत्या मर्यादित नसून, प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या समाजसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांनी सातत्याने विविध सामाजिक व लोकहिताच्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे.
आरोग्यसेवेत पुढाकार
महिला, माता-बाल, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून
• BP – Sugar तपासणी
• नेत्र तपासणी
• कॅन्सर जनजागृती
यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी हजारो नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवली आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात अन्नधान्य वाटपापासून ते उपचारासाठी मदत करत त्यांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले.
महिला सक्षमीकरणाचे भक्कम काम
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी सातत्याने
• महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण
• महिला उद्योजकता व कौशल्य विकास
• शिवणकला, ब्युटी, करिअर मार्गदर्शन
असे उपक्रम राबवून अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची संधी दिली.
हेही वाचा : विराज लांडे यांचा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल
युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास
युवक-युवतींसाठी रोजगार, कौशल्य विकास, Career Guidance, MSME / Udyam नोंदणी तसेच Startup मार्गदर्शनाद्वारे अनेक तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास त्यांनी मदत केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी
• पेन्शन व Life Certificate
• आयुष्मान कार्ड
• संजय गांधी निराधार योजना
• विविध शासकीय योजनांची माहिती व ऑनलाईन अर्ज मदत
या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे.
दैनंदिन नागरी प्रश्नांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा
रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, स्वच्छता यांसारख्या दैनंदिन नागरी समस्यांबाबत अनुराधाताईंनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे काम केले आहे.
स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट प्रभाग क्रमांक १० हे त्यांचे स्पष्ट ध्येय असून, प्रभाग १० हा रोल मॉडेल प्रभाग म्हणून उभा करण्याचे स्वप्न त्या पाहत आहेत. विशेष म्हणजे या स्वप्नाला नागरिकांची भक्कम साथ लाभत आहे.
एक आदर्श शिक्षिका म्हणून असलेली ओळख, नागरिकांना आपलंसं वाटणारं नेतृत्व आणि गतवर्षी शहरातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या उमेदवारांपैकी एक अशी त्यांची ओळख आज प्रभाग क्रमांक १० मधील जनतेसाठी विश्वासाचे केंद्र ठरत आहे.





