मतदारांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच सर्व क्षेत्रीय कार्यालयात ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ सुविधा
!['Know Your Polling Station' facility in all regional offices of Pimpri-Chinchwad Municipal Corporation for the convenience of voters.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Pimpri-Chinchwad-6-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदारांच्या सोयीसाठी १ ते १३ मे या कालावधीत ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ (मतदान केंद्राविषयी जाणून घ्या) कक्ष सुविधेद्वारे मतदारांना मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार आहे. या सुविधेचा शहरातील अधिकाधिक मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
या कक्षासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आहे. सुचेता पानसरे यांची ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी प्राधिकरण, अमर पंडीत ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड, अण्णा बोदडे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी, अंकुश जाधव, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी, राजेश आगळे, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी, सिताराम बहुरे, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी, अजिंक्य येळे, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव आणि उमेश ढाकणे, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, कासारवाडी याप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा
येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढविण्याच्याअनुषंगाने या कक्षाची १ मे पासून स्थापना करण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशीही कक्ष सुरु राहणार असून या कक्षाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा व येत्या मतदानाच्यावेळी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.