Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा

पुणे : बारामती,शिरुर व मावळ या चारही लोकसभा निवडणूक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( दि. 29 ) पुणे दौऱ्यावर आहेत.आज सायंकाळी लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.

हेही वाचा – Ajit Pawar । कोरोनाच्या संकटातच कोल्हे राजीनामा घेऊन आले होते : अजित पवार

कराड येथील सभा संपवून पंतप्रधान मोदी सायंकाळी साडे पाच वाजता हेलिकॉप्टरने रेसकोर्स येथील सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी दीड ते दोन लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 35 हजार लोकांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने, बस यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे व शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button