Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महेश लांडगे यांच्या मंत्रिपदासाठी मांढरदेवीच्या काळुबाईला साकडे
![Kalubai from Mandhardevi nominated for Mahesh Landge's ministerial post](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/PCMC-1-780x470.jpg)
पिंपरी | विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासाठी डाव मांडले जात आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मांढरदेवीच्या काळुबाई चरणी अभिषेक करून साकडे घातले आहे.
हेही वाचा – ‘फुकटचा सल्ला नको’; अजितदादांचा रोहित पवारांना टोला
भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक ११ मधील सामाजिक कार्यकर्त्या किर्ती मारुती जाधव यांच्यावतीने आज मांढरदेवी काळुबाई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मांढरदेवीला जाऊन देवीला रूद्राभिषेक व साकडे घालण्यात आलं.