Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘फुकटचा सल्ला नको’; अजितदादांचा रोहित पवारांना टोला

Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि. २७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले. यानंतर, अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्रीपद अजित पवारांना दिलं तर चांगली गोष्ट आहे. आम्हीही त्या गोष्टीचं स्वागत करू. अभिनंदन करू. पण भाजपाला तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखत असाल तर भाजपा अजित पवारांना सहजपणे मुख्यमंत्री बनवणार नाहीत, असं रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा    –      महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर; कोण होणार मंत्री?

रोहित पवारांच्या त्या वक्तव्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता. ते म्हणाले, बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. आम्ही, आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते, सर्व आमदार, सर्व पक्षाचे अध्यक्ष खंबीर आहेत. ज्याने त्याने आपलंआपलं पाहावं, अशी टीका अजित पवारांनी केली.

मी महाराष्ट्राच्या तमाम मतदार आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. एकंदरीतच उद्या आम्ही तीनही जण दिल्लीला जाणार आहोत. तिथे आमची सर्व पुढची चर्चा होईल. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, सरकार अस्तित्वात येतील. उद्या २८ तारीख आहे. येत्या ३० तारेखेपर्यंत किंवा १ डिसेंबरपर्यंत शपथविधीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button