Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
चिंताजनक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्यने पार केला 39 लाखांचा टप्पा, गेल्या 24 तासात तब्बल 83,341 नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्यने पार केला 39 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासात 83,341 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच 1,096 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 39,36,748 वर पोहोचली आहे. तसेच सध्या देशात 8,31,124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय आतापर्यंत 30,37,152 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णांलयातून घरी सोडण्यात आलेले आहे.





