जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी इंडो ऍथलेटिक्स सोसायटीतर्फे खेड शिवापूर येथे मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे- बेंगलोर हायवे वरील खेड शिवापुर टोलनाक्याच्या येथे शनिवार (दि.२९) रोजी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी (टीम आयएएस) तर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले.
जगभरातील सायकलस्वार भारतभ्रमण करत असताना त्यांना अशा व्यवस्थेचा खूप फायदा होतो. कारण आतापर्यंत सोसायटीचे सायकलिस्ट संपूर्ण भारतभर यांनी सायकल भ्रमण केले आहे. पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते गोवा, पुणे ते हम्पी, पुणे ते गुजरात सोमनाथ अशा सर्वात मोठे देशातील सर्वात मोठ्या ग्रुप राईड देखील संस्थेतर्फे यशस्वीपणे आयोजित केले गेले आहेत.
मागील दहा वर्षापासून “अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम” या उक्तीप्रमाणे संस्थेतर्फे जगभरातील ऍथलेट लोकांचे मोफत मुक्कामाची सोय वडगाव मावळ, लोणावळा, पुणे, पिंपरी चिंचवड ठिकाणी करण्यात आली आहे. आता यामध्ये अजून एक खेड शिवापूर ठिकाण समाविष्ट करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ उद्योजक अमोल भोंडवे, सचिन वाकडकर, अमोल वाकडकर, गणेश लोहार, महेंद्र दिवाकर आदी मान्यवर तसेच इंडो ऍथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी, अमित पवार उपस्थित होते.
हेही वाचा – पिंपरीतील डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे ५५ टक्के काम पूर्ण..!
खेड शिवापूर येथील अनुभवी सायकलिस्ट महेश गोगावले तसेच रवींद्र कोंडे साहेब यांनी या ठिकाणची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. भविष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे इंडो अथलेटिक सोसायटी संस्थेतर्फे सांगण्यात आले. तसेच आपण प्रत्येक टोल नाक्यावर नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया माध्यमातून संपूर्ण देशभर टोलनाक्यावर अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू व त्या संदर्भात लवकरच दिल्लीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन द्यायला जाऊ असे आश्वासन अमोल भोंडवे यांनी दिले. याप्रसंगी भारतीय प्रशासकीय सेवेतील जेष्ठ अधिकारी संकेत भोंडवे यांचे आऊट ऑफ द बॉक्स पुस्तक देखील संस्थेला भेट देण्यात आले.
याप्रसंगी मुकुंद दांगट पाटील, संजय बोकील, भारतीय वायुदलातील सुरेश माने, चंद्रकांत माने, युवराज पाटील, संदीप परदेशी, सुनील चाको, अखिल भारतीय जलतरण संघटनेचे अध्यक्ष कैलास तापकीर, मदन शिंदे, रवींद्र देशपांडे, रिजूल जंत्रे, किरण भावसार, महेंद्र पाटील, नागना इंडी, तानाजीराव मांगडे, अनंत पाटील आदी मान्यवर तसेच नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया चे कर्मचारी देखील उपस्थित होते.