पिंपरी / चिंचवड

शहर कारभा-यांच्या मतदारसंघातील विकासकामांचा बजेटमध्ये समावेश

पिंपरी मतदारसंघाकडे बजेटचे दुर्लक्ष

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेचे नुकतेच आगामी 2022-23 या आर्थिक वर्षाचे शिलकी अंदाजपत्रक सादर झाले. या अंदाजपत्रकात भाजपचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या भोसरी आणि चिंचवड मतदारसांघात पिंपरी मतदारसंघाच्या तुलनेत अधिक झुकते माप मिळाले असल्याचे दिसून येते. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना पालिकेचे हे चाळीसावे बजेट सादर केले. पालिका आय़ुक्त म्हणून राजेश पाटील यांचे हे दुसरे बजेट आहे.

महापालिकेचे पदाधीकारी आणि सत्ताधारी नगरसेवक यांनी नुकताच दिल्लीचा दौरा केला. यावेळी त्यांना दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकची संकल्पना आवडली होती. त्यामुळे यावर्षीच्या बजेटमध्ये दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर जिजाऊ क्लिनिक ही संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. तसेच दिल्ली सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरु केला आहे. त्याचा धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिका देखील पालिकेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करणार आहे. शहर सायकल फ्रेंडली करण्यावर देखील भर असल्याचे बजेटमध्ये दिसत आहे.

आमदार महेश लांडगे हे भोसरीचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे देखील भोसरीचे आहेत. त्यामुळे भोसरीमध्ये अनेक नवीन कामे मंजूर झाली आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघात देखील विविध कामे मंजूर झाली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचा दावा यंदाच्या बजेटमध्ये केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button