ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघीमध्ये एकतर्फी निवडणूक भाजपच्या उमेदवारांनी समतोल राखला!

मिशन- PCMC: राष्ट्रवादीकडे तुलनेत तगडा उमेदवार नाही!

पिंपरी-चिंचवड | निवडणुकीची तारीख अंतिम झाल्यानंतर सर्वत्र उमेदवारांची धावपळ जोरात सुरू झाली. अनेकांनी पक्ष बदलला तर काहींनी आपली निष्ठा जपत पक्षादेश मानत समाधान राखले. असेच काहीसे चित्र दिघी येथे दिसून आले.

दिघी गाव महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी येथे शिवसेनेची मजबूत पकड होती. येथे दत्तात्रय गायकवाड यांनी शिवसेना वाढवली आणि जोपासली होती. परंतु आमदार महेशदादा लांडगे यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत दिघीमध्ये संघटना वाढविली गेली.

दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक ४ येथे २०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार निवडून आलेले होते. आठ वर्षांनी ही निवडणूक होत असताना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तगडा उमेदवार उपलब्ध झालेला नाही. यंदा भाजपने अ गटातून श्रुती विकास डोळस, ब गटातून माजी सैनिक कृष्णा भिकाजी सुरकुले, क गटातून हिराबाई नानी घुले तर ड गटातून प्रबळ नेतृत्व म्हणून उदय दत्तात्रय गायकवाड हे चार तगडे उमेदवार उभे केले आहेत.

आज कार्तिक लांडगे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून ग्रामदैवत काळभैरवनाथ मारुती मंदिर, दिघी आणि बापुजीबुवा मंदिर, बोपखेल येथे प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत हा प्रचार दौरा संपन्न झाला.

हेही वाचा     :            पिंपळे सौदागरमध्ये शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात भाजपचा ‘धडाका’ 

अजित पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत वाळके यांना संधी मिळाली असली तरी, त्यांच्या जनसंपर्क आणि विकासकामांचा अभ्यास करता उदय गायकवाड हे बाजी मारतील असे संकेत मिळाले आहेत.

चंद्रकांत वाळके यांच्याच कुटुंबीयातील मातब्बर समजले जाणारे शिवसेना नेते संतोष वाळके यांनी काल दिघीतील आणि शहरातील असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. संतोष वाळके आणि दत्तात्रय गायकवाड यांनी या भागात शिवसेनेचे वर्चस्व राखले होते. गुरु-शिष्य नात्यातील हे दोघे आता भाजपचा प्रचार आणि प्रसार जोरदार करत आहेत. त्यामुळे अजित पवार गटाचे चंद्रकांत वाळके यांची संधी कमी झाली आहे. तथापि संधी न मिळाल्याने नाराज भाजपच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी आमदार महेशदादा लांडगे यांनी दूर केली. पक्षाचा आदेश, महेशदादा लांडगे यांचा विश्वास आणि दत्तात्रय गायकवाड यांचा शब्द मानत सर्वांनी दिघी-बोपखेलमध्ये जोरदार प्रचारबाजी सुरू केली आहे. त्यामुळे यंदाही चारही उमेदवार निवडून येतील, असा ठाम विश्वास जनतेत दिसून येत आहे.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पॅनेल प्रगल्भ आणि सक्षम आहे. आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या ऐकू आणि सोडवण्याचा प्रयत्न करू. यंदा प्रभागात दिलेल्या पाठिंब्याला आम्ही पूर्ण उत्तर देऊ.

— उदय दत्तात्रय गायकवाड, उमेदवार, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button