ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत भाजपा बूथ सक्षमीकरण अन्‌ कार्यकर्त्यांमधील समन्वयावर भर!

भाजपा शहर वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी यांची माहिती

पिंपरी-चिंचवड | भाजपाच्या संघटनात्मक ताकदीवर भर देताना, भोसरी विधानसभा मतदारसंघात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संजय पटनी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी, बूथ सक्षमीकरण आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाबाबत माहिती दिली. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे.

बैठकीस भाजपाचे सरचिटणीस विकास डोळस, पदाधिकारी मंगेश गुरव, मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे, अजय साने, प्रमोद परदेशी, रामदास कुटे आणि आमदार सहाय्यक सचिन फोंडके उपस्थित होते. सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संजय पटनींच्या मार्गदर्शनाखाली एकसंघ, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम संघटनेच्या माध्यमातून भोसरी विधानसभा आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा     :            निर्भय कन्या अभियान: चिंचवडमध्ये कराटे व महिला हक्क कार्यशाळा उत्साहात 

संजय पटनी म्हणाले की, “संघटन हीच आपली खरी शक्ती आहे. भाजप फक्त निवडणुकीसाठी नव्हे, तर ३६५ दिवस जनसेवेसाठी आणि संघटन वाढीसाठी कार्यरत असते. माझा आग्रह आहे की प्रत्येक कार्यकर्ता आपल्या कार्यात प्रामाणिकपणा, उत्साह आणि समर्पण घेऊन पुढे येईल, कारण संघटनाच्या जोरावरच आपला विजयी मार्ग निश्चित होतो.”

संघटन हीच भाजपाच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आम्ही फक्त निवडणुकांसाठी काम करत नाही; भाजप ३६५ दिवस, वर्षभर, जनसेवा आणि संघटनाच्या बांधणीसाठी कार्यरत आहे. प्रत्येक बूथ, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक कार्यक्रम हे आपल्यासाठी संधी आहेत, जिथे आपण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकतो. एकत्रितपणे, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम संघटनेच्या माध्यमातून आपण भोसरी विधानसभा आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाची ताकद अधिकाधिक वाढवू शकतो.

– संजय पटनी, वरिष्ठ उपाध्यक्ष, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button