धक्कादायक घटना, निवडणूक अधिकाऱ्यांची कारच पेटवली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/शंकर-जगताप-29-780x470.jpg)
पिंपरी : चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याची चारचाकी वाहन एका दिव्यांग व्यक्तीने आग लावून पेटवून दिली आहे. सोपान ओव्हाळ असं या व्यक्तीचं नाव आहे. दिव्यांग सोपान ओव्हाळ यांनी 15 ऑगस्टला महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच वाहन देखील फोडण्याचा प्रयत्न केला होता. दिव्यांग सोपान ओव्हाळ यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाकडे रसवंती गुर्हाळ आणि रमाई आवास योजनेच घरकुल मिळाले नाही त्या नैराश्यामधून कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सोपान ओव्हाळ यांनी असं का केलं असेल? अशी चर्चा आता रंगत आहेत. अर्थात त्यामागचं कारण देखील समोर आली आहे. या प्रकरणी आता प्रशासन आणि पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
थेरगाव येथील पिपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी सध्या चिंचवड विधानसभा निवडणुकीचे काम सुरू आहे. याच ठिकाणी चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय देखील आहे. त्याच कार्यालयात एका दिव्यांग व्यक्तीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका चारचाकी वाहनाला आग लावून पेटवून दिलं आहे. सुदैवाने यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे कोणतेही कर्मचारी जखमी झाले नाहीत. वाहन पेटवून देणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला आणि सोबत असलेल्या दोन व्यक्तींना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा – अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाचे दरवाजे बंद; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
दरम्यान, कोणतीही गोष्ट असूद्या, पण आपला राग आपल्या नियंत्रणात असणं जास्त आवश्यक आहे. प्रत्येक समस्येचं निराकरन हे रागाने किंवा आदळाआपट करुनच होईल, असं नसतं. त्यामुळे कोणतीही टोकाची गोष्ट करताना आपण अनेक वेळा विचार करायला हवा. अन्यथा आपल्याला त्या कृत्यामुळे पश्चात्ताप करावा लागू शकतो. बऱ्याचदा प्रशासनाच्या विरोधात नाराजी असल्यास अनेकजण जाळपोळीचा प्रकार करतात. पण त्यामुळे जीवित आणि वित्तहानीचा जास्त धोका असतो. आपण संबंधित प्रशासनाविरोधात शांततेत आंदोलन करु शकतात. पण कायदा हातात घेणं चुकीचं आहे. पिंपरी चिचंवडच्या सोपान ओव्हाळ यांनी कायदा हातात घेतल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणी पोलीस काय-काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.