breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ऑटो टॅक्सी मालकांना व्यवसाय वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय’; बाबा कांबळे

पुणे आरटीओ कार्यालयातील बैठकीत टॅक्सीचे दर निश्चित

महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी आंदोलन केले होते. आरटीओने त्याचे दर वाढविण्याला परवानगी दिली आहे.३९ रुपये आणि पुढील प्रति एक किलोमीटरसाठी २६ रुपये हे जर टॅक्सी साठी निश्चित करण्यात आले आहेत हे आंदोलनाचे यश असून त्याचा सर्वसामान्य टॅक्सी व रिक्षा चालक मालकांना फायदा होणार त्यांचा व्यवसाय वार्तिक उत्पन्न वाढणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

पुणे आरटीओ कार्यालयात टॅक्सी, ऑटो चालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी बाबा कांबळे यांनी संघटनेच्या वतीने आपली भूमिका मांडली.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पुणे येथील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच पंत प्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या मागणीला अखेर यश आले आहे. टॅक्सी दर वाढविण्याची कार्यवाही आरटीओने केली आहे.

हेही वाचा – ‘तानाशाही नही चलेगी..मणिपूरबाबत न्याय द्या..’; संसदेतील घटनेनंतर महिलेची जोरदार घोषणाबाजी!

या बैठकीत पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा प्रदर्शनचे अध्यक्ष जेष्ठ नेते आनंद तांबे, सत्यसेवा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले, जनता गॅरेज संघटनेचे, सचिन वैराट अल्ताफ शेख, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे विजय रवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख बाळासाहेब ढवळे, शुभम तांदळे, विलास कमसे पाटील, अर्शद अंसारी, किरण एरंडे, लोणावळा शहराचे अध्यक्ष आनंद सदावर्ते, याकूब शेख आदी या वेळी उपस्थित होते.

ऑटो रिक्षाचे दर पहिल्या दीड किलो मीटरसाठी २५ रुपये व पुढील प्रत्येक किलो मीटरसाठी १७ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. टॅक्सीचे दर मात्र १७ रुपये होते. परिणामी प्रवासी रिक्षात येत नव्हते. त्याचा रिक्षा चालकांना फटका बसत होता. त्यामुळे टॅक्सीचे दर वाढविण्याची मागणी देखील बाबा कांबळे यांनी केली होती.

बाबा कांबळे म्हणाले की, एप्रिल २०२३ मध्ये पुणे आरटीओ समितीने काळ्या पिवळ्या टॅक्सीचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरला ३१ रुपये व पुढील प्रति एक किलोमीटरला २१ रुपये दर करण्यात आला होता. त्यावेळी सीएनजी गॅसचा दर हा ८६ रुपये होता. त्या सीएनजी दरामध्ये सध्या वाढ झाली नसल्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये निश्चित केलेला दरच कायम करण्यात आला आहे. खटवा समितीच्या शिफारशीनुसार काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरापेक्षा ओला उबेरच्या एसी कॅबला २५ टक्के दरवाढ करण्यात यावी अशी शिफारस आहे. या शिफारशीनुसार सध्या झालेल्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये असे ठरवण्यात आलेले आहे. त्यानुसार ओला उबेर कॅबचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३९ रुपये आणि पुढील प्रति एक किलोमीटरसाठी २६ रुपये दर शिफारस म्हणून पाठवण्याचे ठरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button