breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘तानाशाही नही चलेगी..मणिपूरबाबत न्याय द्या..’; संसदेतील घटनेनंतर महिलेची जोरदार घोषणाबाजी!

Parliament Attack 2023 : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून दोन तरूणांनी उड्या मारल्या. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. या प्रकारानंतर संसदेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर एका महिलेने संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

संसदेत घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. नीलम आणि अमोल शिंदे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही मोठ्या घोषणा केल्या. तानाशाही नहीं चलेगी..मणिपूरबाबत न्याय द्या..महिलांवरील अत्याचार नाही चालणार..भारत माता की जय, हुकुमशाही बंद करा.. जय भीम, जय भारत, महिलांवरील अत्याचार नाही चालणार..वंदे मातरम…अशा घोषणा या दोघांनी केल्या.

हेही वाचा  –  ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे’; गौतमी पाटील 

सभागृहात नेमकं काय घडलं?

खासदार अरविंद सावत म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button