ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाईन्यूज On The Spot : घरकुलच्या आरक्षीत जागेवर बेकादेशीर बांधकाम!

महापालिका प्रशासनाचा कानाडोळा : अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक ११ मधील घरकुल प्रकल्प जो आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आला. आज गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे. तब्बल १५८ इमारती, सुमारे साडेसहा हजार फ्लॅट्स आणि २५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या प्रचंड वसाहतीसाठी १५ एकर आरक्षित जागा राखून ठेवण्यात आली होती. या जागेवर शाळा, क्रीडांगण, सांस्कृतिक सभागृह आणि उद्यान अशा मूलभूत सुविधांची उभारणी होणे अपेक्षित होते.

मात्र, वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. गेल्या प्रशासकीय काळातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि कामकाजातील ढिलाईमुळे या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ज्या जागेवर मुलांनी खेळायला हवे होते, जिथे नागरिकांना मोकळा श्वास घ्यायला मिळायला हवा होता, ती जागा आता बेकायदेशीर बांधकामांनी गिळंकृत केली आहे.

Illegal Construction on Land Reserved for the Gharkul Scheme!

हेही वाचा     :          महाईन्यूज On The Spot : प्रभाग ११ मध्ये जॉगर्स पार्कमधील मोकळ्या जागेवर अतिक्रमण! 

सर्वात गंभीर बाब म्हणजे, या प्रकरणाकडे वारंवार लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रारींचे ढिग वाढत आहेत, पण कारवाई शून्य यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
हा केवळ अतिक्रमणाचा प्रश्न नाही, तर हजारो नागरिकांच्या हक्कांचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्रशासनाची ही उदासीनता नेमकी कोणाच्या फायद्यासाठी आहे? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? आणि सर्वात महत्त्वाचे या २५ हजार नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा कधी मिळणार?

आता नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. जर तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर या प्रकरणावर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने आता तरी जागे होऊन अतिक्रमण हटवून आरक्षित जागा मूळ उद्देशासाठी मोकळी करावी, हीच सर्वसामान्यांची मागणी आहे.

“संबंधित १५ एकर जागा आमच्यासाठी शाळा, मैदान आणि उद्यानासाठी राखीव होती, पण आज तिथे अतिक्रमणच दिसतं. आम्ही वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही काहीच कारवाई होत नाही. आमच्या मुलांच्या भविष्यासोबत असा खेळ का केला जातोय? आता तरी प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण हटवून आमचे हक्क परत द्यावेत, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.”

– स्थानिक नागरिक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button