ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघाकडून भीम अनुयायांची अन्न-पाणी सेवा

पिंपरी चिंचवड | शहरात आज महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने पिंपरी येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर, पिंपरी चौकात अभिवादनासाठी आलेल्या भीम अनुयायांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने अन्न व पाणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी भीम अनुयायांची सेवा करत सामाजिक बांधिलकी जपली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे शहर अध्यक्ष विनय सोनवणे यांनी या उपक्रमाच्या आयोजनामध्ये मोलाचे योगदान दिले.

अन्न-पाणी सेवा सुरू असताना आमदार शंकर जगताप, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शिवसेना नेते युवराज कोकाटे, कैलास कुटे, दीपक नागरगोजे यांच्यासह विविध पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून भीम अनुयायांना अन्न व पाणी वाटप करून शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा      :          महाईन्यूज On The Spot : घरकुलच्या आरक्षीत जागेवर बेकादेशीर बांधकाम! 

दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीम सृष्टी येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी व नागरिक येत असतात. त्यांच्या अन्न-पाण्याची व अल्पोपहाराची सोय व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भीम अनुयायांसह उपस्थित पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पत्रकारांनी अभिवादन केले.

यावेळी आयोजक पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी, डिजिटल मीडिया परिषद अध्यक्ष विनय सोनवणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे यांच्यासह पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद पिंपरी चिंचवडचे सदस्य व पदाधिकारी तसेच सक्रीय पत्रकार महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, संतोष गोतावळे, संभाजी बारबोले, रोहित जाधव, अशोक कोकणे, दत्ता कांबळे, नरेश जीवनाल, हनुमंत रामदासी, सीता जगताप आदी पत्रकार उपस्थित होते. तसेच विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button