पिंपरी / चिंचवड

भैरवनाथ यात्रेला गेलेल्या महिलेची पर्स हिसकावली

पिंपरी l प्रतिनिधी

भोसरी येथील भैरवनाथ यात्रेला गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने हिसकावून नेली. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी सव्वासात वाजता चिखली चौकाजवळ चिखली येथे घडली.

पूनम सचिन ढोरे (वय 38, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेसाठी फिर्यादी रविवारी सकाळी गेल्या होत्या. यात्रेतून परत घरी येत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. पर्मध्ये दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठन, मोबाईल फोन, कागदपत्रे असा 65 हजारांचा ऐवज होता. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button