Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अधीक्षक अभियंत्यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांचा अनोखा उपक्रम

पिंपरी / महाईन्यूज

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साधून पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य तथा पिंपरी-चिंचवडचे शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांनी पुणे ग्रामीण परिमंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एन 95 मास्क आणि सॅनिटायझर वाटप करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोनाकाळात महावितरणच्या सर्वच कर्मचा-यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केले. संपूर्ण लॉकडाऊन असताना देखील विद्युत कर्मचा-यांना जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावावे लागले. उन-वारा-पाऊस न पाहता सामान्य नागरिकांना सुरळीत विजपुरवठा केला. वीज बिले वेळेवर काढून घरोघरी वाटप केली. अनेकांच्या तक्रारींचे निराकरण केले. खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री अपरात्री सेवा दिली. या सर्वांचे कौतुक करत सौंदणकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने शहरात जनसेवा सप्ताह सुरू आहे. तसेच, पुणे ग्रामीण परिमंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांचा देखील आज वाढदिवस साजरा झाला. कोरोनाकाळात नियंत्रणाची बाब म्हणून त्यांना एन 95 मास्क आणि सॅनिटायझर वाटप करून संतोष सौंदणकर यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागप्रमुख नितीन बोंडे, सुरज भराटे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button