Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या वाल्मीक कराडला फाशी द्या..

शिवसेना युवासेना, भोसरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन...

भोसरी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत शिवसेना युवासेना, भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत क्रूर आणि खुनी वाल्मीक कराड याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा सेना प्रमुख श्रीकांत शिदे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले होते.

हेही वाचा –  शहरातील झोपडपट्टी वासियांना होणार महिला बचत गटांच्या महिलांमार्फत सेवाकर बीलांचे वितरण व सर्वेक्षण

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख शिरुर लोकसभा तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, निलेश मुटके, युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, युवासेना विधानसभा भोसरी प्रमुख आशिष जगदाने, युवसेना उपशहर प्रमुख दत्ता आवराळे, रोहित जगताप, भिवाजी वाटेकर, पठारे मामा, सर्जेराव कचरे, संपर्क प्रमुख कॉलेज कक्ष संकेत चावरे, शिवसेना विभागप्रमुख श्रीकांत सुतार, अक्षय तुरकणे, प्रविन मोरे, जितेश मंजुळे, वसीम खान, नागेश हनवटे, समर्थ नाईकवाडे, बबन काळे आणि शिवसैनिक व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

गेली दोन दिवसांपासून स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचे सोशल माध्यमावर वायरल झालेले फोटो माणुसकीला काळीमा फासणारे व तीव्र संताप आणणारे आहेत. याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराड व सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली जावी, असे मत यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button